भोर एज्युकेशन सोसायटी ही ग्रामीण भागात कार्य करणारी शैक्षणिक संस्था आहे. भोर तालुका हा दुर्गम तालुका असून बहुतांश लोक
शेतकरी आणि कष्टकरी आहेत.या सर्वसामान्य लोकांना विकासाची साधने उपलभ्ध करून , विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवून
देशाचे आदर्श नागरिक तयार करण्याचे पवित्र कार्य करत आहे.अनेक ठिकाणी विनाअनुदानित शाळा सुरु करून अनेक वर्ष
चालवल्या.आज तालुक्यात जवळ जवळ 8 शाळा कार्यरत आहेत.मुकबधीर विद्यार्थ्यांना समाजातील मुख्य प्रवाहात येता यावे व
शिकण्याची संधी उपलब्ध कर्नु देण्यासाठी
निवासी मुकबधीर विद्यालय सुरु करण्यात आले आहे.
- राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महविद्यालय -१८९७
- दिनकरराव धाडवे पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महविद्यालय-
- आपटी माध्यमिक विद्यालय,आपटी-
- पिसावरे माध्यमिक विद्यालय, पिसावरे-
- पसुरे माध्यमिक विद्यालय, पसुरे
- रायरी माध्यमिक विद्यालय ,रायरी-१९९७
- बारे माध्यमिक विद्यालय ,बारे-
- निवासी मुकबधीर विद्यालय, भोर
प्रयोगशाळा
विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रयोगशील होवून विज्ञानाचे धडे गिरवता यावेत भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र
,जीवशास्त्र म्हणून विद्यालात स्वतंत्र प्रयोगशाळा बांधण्यात आलेल्या आहेत.वर्षभर इयत्ता 5 वी ते इयत्ता 12
वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षक प्रयोग करून दाखवत असतात व मुलांनाही प्रयोग करण्याची संधी दिली
जाते.