Raja Raghunathrao Vidyalaya

  1. Home
  2. Docs
  3. About us
  4. Vision

Vision

राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ट महाविद्यालय भोर तालुक्यातील एक नामांकित शाळा आहे.१८९७ साली भोर विद्यालय या
नावाने सुरु झालेल्या या शाळेची नवीन इमारत १९३७ साली बांधण्यात आली.शाळेचे नाव बदलून राजा रघुनाथराव विद्यालय असे
करण्यात आले.भोर तालुक्यातील २३०० मुले शाळेत शिक्षण घेत आहेत.प्रामुख्याने शेतकरी कुटुंबातील या मुलांना शिक्षण देवून
समाजातील आदर्श नागरीक घडवण्याचे कार्य शाळा अविरतपणे करत आहे.या मुलांना शिक्षण व संस्कार देत असताना त्यांना
आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शाळा सातत्त्याने करत आहे.शाळेच्या समोर काही उद्दिष्टे आहेत.येत्या काही
काळात टी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
1)शाळेत MSCIT हा संगणक शिक्षण अभ्यासक्रम सुरु करणे.
2)विद्यार्थ्यांसाठी एक परकीय भाषा उदा.जर्मनी किंवा फ्रेंच सुरु करणे.
3) क्रीडासंकुल उभारून विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देणे व देश उभारणीस हातभार लावणे.
4)विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु करणे.